Breaking News

होमिओपॅथिक गोळ्यांचे होणार वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेलमधील नंदनवन ग्रुप आणि टी क्रिकेट क्लबच्या वतीने नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तीन लाख अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांच्या बाटल्या वाटण्याचा निर्णय घेतला आहे. यातील दीड लाख बाटल्या पुढील दोन दिवसात वितरित करायला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांना सहकार्य करणारे डॉ. नितीन पोवळे यांनी दिली.

केंद्रीय आयुष मंत्रालयाने अर्सेनिक अल्बम थर्टी ही गोळी कोरोना वायरस होऊ नये, म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार पनवेलमधील डॉ. नितीन पोवळे यांनी गोळ्यांचे वाटप सुरु केले आहे. त्याचप्रमाणे नंदनवन ग्रुप आणि टी क्रिकेट क्लब याच्या वतीने शहरातील विरुपाक्ष सभागृह येथे गोळ्यांचे पॅकींग करण्याचे काम सुरु झाले आहे. डॉ. पोवळे यांच्यासह नितीन पाटील, संजय पाटकर, राजेश जेठिया, श्रीकांत चवरे, सुभाष पाटील, नंदू पटवर्धन, अप्पू कुंभार, संदीप लोंढे हे या ग्रुपचे सदस्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मेहनत घेऊन दररोज गोळ्या पॅकिंग करत आहेत. त्यांनी तीन लाख बाटल्या बनवून साधारण 12 लाख जणांना याचा लाभ दिला जाणार आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply