पनवेल ः वार्ताहर
तळोजा औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नं. 34मधील इजियोक्रिस्ट ऑरगॅनिक केमिकल कंपनीला मंगळवारी (दि. 9) दुपारी अचानकपणे भीषण आग लागली. आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. पनवेलसह नवी मुंबई व परिसरातील 11 अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचून आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू करण्यात आले. आगीची झळ आजूबाजूच्या कंपन्यांनासुद्धा बसली.