Breaking News

’पंचमवेद’ची सावरकरांना सांगितिक आदरांजली

पनवेल : रामप्रहर वृत्त – भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती गुरुवारी (दि. 28) झाली. यानिमित्त येथील पंचमवेद या संस्थेच्या वतीने एका ऑनलाइन दृक् श्राव्य सांगितिक सोहळ्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला.

संगीतकार व प्रसिद्ध व्हायोलीनवादक विजय मनोहर यांच्या संकल्पनेतून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली. सध्याच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्व कलाकारांनी स्वतःच्या घरातूनच सादरीकरण करून स्वा. सावरकर यांना आदरांजली अर्पण केली. 

या कार्यक्रमाचा प्रारंभ विजय मनोहर यानी सावरकर रचित ’जयोस्तुते’ हे गीत माऊथॉर्गनवर सादर करून केला. त्यानंतर त्यानी ’हे हिन्दुनृसिंहा’ हे गीत सादर केले. त्याना अ‍ॅड. अतुल जोशी यानी तबला साथ केली. पत्रकार श्रीनिवास काजरेकर व श्रेया काजरेकर यांनी ’संगीत उःशाप’ या नाटकातील प्रवेशाचे अभिवाचन केले. कवी मिलिन्द गांगल यांनी ’तात्यारावांस पत्र’ ही सद्यस्थितीवर आधारीत स्वरचना सादर केली.

उरण येथील प्रसिद्ध गायक महेश घाटे व चिपळे येथील गायिका शलाका देशपांडे यांनी करावकेच्या साथीने गायिलेल्या ’ने मजसी ने परत मातृभूमीला’ या गाण्याने कार्यक्रमाचा समारोप झाला. डॉ. निखिल मनोहर यांनी आपल्या ओघवत्या वाणीने कार्यक्रमाचे निवेदन केले. मेधा मनोहर व गंधार देशपांडे यानी तांत्रिक सहाय्य केले. (हा कार्यक्रम युट्यूबर उपलब्ध करण्यात आला https://youtu.be/c4-7wuyjEC8 या लिंकवर पाहता येईल.)

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply