कळंबोली ः रामप्रहर वृत्त
दीपावलीचा सण जवळ आल्याने कळंबोली येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून बाजारभावापेक्षा स्वस्त दरात दिवाळी फराळ साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असून या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ रविवारी (दि. 12) करण्यात आला. भाजप कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील, महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष प्रिया मुकादम, माजी नगरसेवक बबन मुकादम, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, मोनिका महानवर, माजी मंडळ अध्यक्ष रविनाथ पाटील, बबन बारगजे, अमर ठाकूर, अशोक मोटे, सरस्वती काथारा, मनीषा तिवारी, अतुल वाघमारे, दत्तात्रय फरांदे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
या उपक्रमात खोबरे, शेंगदाणे, रवा, मैदा, चणाडाळ, साखर, गूळ, पोहे, जेवणाचे तेल व डाळ अशा वस्तू बाजारभावापेक्षा कमी दरात नागरिकांना जय अपार्टमेंट, सेक्टर 4, शिर्के गार्डनजवळ, कळंबोली येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 12 ते 15 ऑक्टोबरदरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत हा उपक्रम सुरू राहणार आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कळंबोली भाजपकडून करण्यात आले आहे.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper