उरण : वार्ताहर
कोरोना महामारीच्या काळात अनेक रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताची ही तूट भरून काढण्यासाठी भाजप युवा मोर्चा उरणच्या वतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी (दि. 31) उरणमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
जेएनपीटी टाऊनशिप मल्टिपर्पज हॉल येथे सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर होणार असून, या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार महेश बालदी, भाजपचे उरण तालुका मंडल अध्यक्ष रवी भोईर, शहर मंडल अध्यक्ष कौशिक शहा आणि युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शेखर पाटील यांनी केले आहे.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …