Breaking News

शेतीच्या वादातून शेतकर्याची हत्या

सात जणांविरोधात गुन्हा दाखल

हिंगोली ः प्रतिनिधी

तालुक्यातील राहुली बु. येथे शेतीच्या वादातून एकाची संगनमत करून हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शंकर लक्ष्मण डोरले (35) असे मृत शेतकर्‍याचे नाव असून या प्रकरणी सात जणांविरोधात ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मण डोरले यांचे शेतीच्या प्रकरणात काही शेजार्‍यांसोबत जुने वाद आहेत. यावरून तीन महिन्यांपूर्वी त्यांचे भांडणही झाले होते. मंगळवारी सायंकाळी लक्ष्मण त्यांच्या शेतात एकटे असताना शेजार्‍यांनी शेतीच्या वादातून परत वाद सुरू केला. यातून सहा ते सात जणांनी मिळून त्यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली, तसेच त्यांच्यावर कुर्‍हाडीने वार करत गंभीर जखमी केले. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी ए. जी. खान  यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी लक्ष्मण गणपती डोरले यांच्या फिर्यादीवरून गणेश डोरले, अंबादास उर्फ बाबुशा घोंगडे, विठ्ठल घोंगडे, ज्ञानेश्वर बोरगड, मारुती डोरले, रामकिशन डोरले आणि  नामदेव घोंगडे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि. सुडके करीत आहेत. यातील चौघांना अटक करण्यात आली असून, फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply