Breaking News

विकासकामांच्या पालखीचे वारकरी

ऑगस्ट महिना हा क्रांतिकारकांचा समजला जातो. 5 ऑगस्ट हा दिवसही अशाच एका विकासकामांत क्रांती घडवून कार्यसम्राट म्हणून ओळखल्या जाणार्‍या नेत्याचा जन्मदिवस आहे. तो नेता म्हणजे प्रशांत ठाकूर. नेता हो, म्हणताना नेता होत नाही. त्यासाठी अंगभूत नेतृत्वगुण असावे लागतात. त्या गुणांना योग्य कोंदण मिळावे लागते. असे संस्कारक्षम कोंदण पिताजी मा. रामशेठ ठाकूर यांच्या सान्निध्यातून प्रशांतदादांना मिळाले.

वडिलांच्या आदर्शाबरोबरच स्वतःच्या शांत व संयमी स्वभावाने़ कार्य करण्याची जिद्द व क्षमता आमदार प्रशांत ठाकूर यांना प्राप्त झाली. कणखर वृत्ती जरूर आहे़, पण उद्धटपणा नाही. मूलतः असलेल्या संघटन कौशल्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांची गावोगावी फौज निर्माण केली. केलेल्या कामांचा़, कष्टाचा अभिमान आहे, पण ते गर्विष्ट नाहीत. समंजसपणा़, महत्त्वाच्या कामासंबंधी सखोल विचार करण्याबरोबरच परिणामांचा विचार करून निर्णय घेण्याच्या प्रवृत्तीने त्यांना नेता बनविले. अशा तर्‍हेच्या उपजत गुणांमुळे युवा पिढीचे कार्यकर्ते व जनता त्यांच्याकडे आकर्षित होत आहे. परिणामी विकासकामांना गती मिळत आहे. कर्जत-खालापूर भागांतील वनवासी जनता विकासकामांनी जोडल्याने भाजपशी जोडले गेले आहेत.

आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीला महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे. आषाढी एकादशी म्हणूनही ती प्रसिद्ध आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व माऊली ज्ञानेश्वर यांच्या, तसेच विठोबा-रखुमाईच्या पालख्या गावागावातून लाखो वारकर्‍यांसह पंढरपुरात या दिवशी येतात. लाखो वारकरी सोबत येत असतात. केवळ विठ्ठलाच्या दर्शनासाठी, हे आपण सर्वांनी दृश्य स्वरूपात पाहिले आहे. प्रशांतजी भाविक आहेतच. श्रीगणेशाचे भक्त आहेत. पनवेल विभागात एकादशीला विद्यार्थ्यांनी काढलेल्या पालखीचे भोई होऊन त्यांनी पालखी सोहळ्यात नुकताच भाग घेतला होता. श्रीहरी विठ्ठलाच्या पालखीचे भोई जरूर बनले, पण़ त्यांच्या मनात व खांद्यावर ध्येय आहे ते सबका साथ सबका विकास. ही विकासकामांची पालखी वाहून नेऊन ती जनताजनार्दनाच्या मंदिरात पोहचविण्याची जिद्द त्यांनी बाळगलेली आहे. ते विकासकार्याचे वारकरी आहेत.

आमदारकीच्या दोन्ही कार्यकाळात पनवेल शहर व खेडेगावातील विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन प्रशांतदादांनी झोकून देऊन कार्य केल्यामुळे अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे त्यांची कार्यसम्राट ही प्रतिमा उभी राहिली. गत पाच वर्षांच्या काळात शासनाच्या निरनिराळ्या संस्था व शाखांकडून आर्थिक सहाय्य मिळवून अनेक महत्त्वाचे प्रकल्प त्यांनी पुरे केले आहेत, तर काही मार्गी लावले आहेत. या त्यांच्या कार्यप्रवण व्यक्तिमत्त्वाची दखल घेऊन भाजपच्या धुरिणांनी त्यांना रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. प्रशांतजींनी अध्यक्षपदाची धुरा घेऊन झंझावती दौर्‍यांनी रायगड जिल्हा पिंजून काढला. परिणामी़ नगण्य प्रतिनिधी व सभासद संख्या असलेल्या जिल्ह्यात जिल्हा परिषद़, पंचायत समिती़, नगर परिषदा व गाव पातळीवरील ग्रामपंचायतीमध्ये अपेक्षित यश मिळवित जिल्ह्याला भाजपची ओळख दिली. नव्याने निर्माण झालेल्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत आक्रमक प्रचाराने बहुसंख्य प्रतिनिधी निवडून आणले. अनेक वर्षाची प्रस्थापितांची मिरासदारी मोडून भाजपची सत्ता आणली. शासनाने त्यांना सिडकोचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. मग सिडकोच्या प्रलंबित प्रश्नांना व प्रकल्पांना गती देऊन ते मार्गी लावले आहेत.

राजकीय मंडळींना कला़, क्रीडा व सहित्यात गती नसते असे म्हणतात. प्रशांतदादा मात्र अपवाद आहेत. त्यांना वाचनाची आवड असून वेळ मिळेल तेव्हा ते पुस्तके वाचतात. क्रीडा क्षेत्रातही त्यांचे योगदान आहे. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नामवंत क्रीडापटूंना विविध स्पर्धांद्वारे व्यासपीठ ते मिळवून देत असतात. शैक्षणिक प्रश्नांबाबत ते आग्रही असतात. खाजगी शिक्षण संस्थांकडून दरवर्षी निरनिराळ्या कारणासाठी वाढीव फीसाठी आळा बसावा म्हणून विधानसभेत आवाज उठवून कायदा करून घेतला असून, दरवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करतात. त्याचबरोबर गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाबरोबरच त्यांचा गौरव करून प्रोत्साहन देतात. प्रशांतदादा अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या प्रयत्नाने दरवर्षी राज्यस्तरीय अभिनय स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. यावरून त्यांचे कलाप्रेम दिसून येते. बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे भरवून नोकरीच्या संधी मिळवून देतात. निरनिराळ्या संस्थांना मदतीचा हात देऊन उभारी देत असतात. शासनमान्य पनवेलच्या तालुका वाचनालयास संगणक भेटीदाखल दिले आहेत. कामगारांच्या हिताकडेही त्यांचे लक्ष आहे. काही कंपन्यांमधील कामगारांवर होणारे अन्याय सामोपचाराने मिटवून न्याय व सोयीसुविधा मिळवून दिल्या आहेत.

प्रशांतदादा असे सर्वस्पर्शी नेतृत्व करीत असले, तरी पंतप्रधान मोदींच्या सबका साथ सबका विकास हे उद्दिष्ट विसरलेले नाहीत. कर्जत व खालापूर विभागांत जी विकासकामे झाली आहेत व चालू आहेत त्यामध्ये जिल्हाध्यक्ष आमदार व अध्यक्ष सिडको म्हणून त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. त्यांनी पनवेल महानगरपालिका हद्दीतील विकासकामांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी आणला असून, लवकरच ती कामे सुरू होणार आहेत. त्याचप्रमाणे पनवेलमधील विजेचा लपंडाव बंद होऊन वीजपुरवठा सुरळीत व्हावा म्हणूऩ सर्व सोईंनी युक्त असे अत्याधुनिक यंत्रणा असलेले विद्युत उपकेंद्र सुरू होत आहे. अनेक दिवस प्रलंबित असलेले जिल्हा व सत्र न्यायालय न्यायालयाच्या नव्या इमारतीत सुरू झाले आहे. याकामी प्रशांतजींनी मुख्यमंत्री व विधी व न्याय मंत्र्यांना भेटून सर्व अडचणी दूर करून ही परवानगी मिळविली आहे. त्यांच्याच प्रयत्नाने खारघर येथे वर्ल्ड मॉलसमोर टॅक्सी स्टॅन्ड उभारला गेला आहे. महिला उद्योजकांसाठीही ते प्रयत्नशील आहेत. कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या महिलांनी बनविलेल्या वस्तूंना प्रशांतजींनी बाजारपेठ मिळवून दिली.

प्रशांतदादांच्या 18 तास बिझी शेड्युलमुळे प्रभावित होऊन व भाजपच्या प्रभावी नियोजन व धोरणात्मक कार्यक्रमाने प्रभावित होऊन महाराष्ट्राबरोबऱ रायगड जिल्ह्यात व पनवेल मतदारसंघात अन्य पक्षातील कार्यकर्ते विश्वासाने भाजपमध्ये इनकमिंग करीत आहेत. त्याचे श्रेयही त्यांनाच द्यावे लागेल. पर्यावरण व आरोग्य संरक्षण यासाठी ते आग्रही आहेत. वनमहोत्सव साजरा करून वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण करीत आहेत. पनवेलचे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे अडथळे दूर करून ते लवकरच सुरू होणार आहे. स्वतःच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आरोग्य महाशिबिर भरवून जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. विकासकामांची पालखी खांद्यावर घेऊन वारकरी बनलेले आमदार तथा अध्यक्ष सिडको मंडळ प्रशांतजींचा उद्या वाढदिवस आहे. मी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देऊन पुढील विधानसभेच्या रणसंग्रामात विजयी होऊन हॅट्ट्रिक साधावी अशी जनसामान्यांची अपेक्षा आहे ती पूर्ण होईल याची खात्री आहेच. पुढील विधानसभेत प्रशांतदादांना मंत्रिपदाची खुर्ची मिळावी ही प्रभूचरणी प्रार्थना.

-अनंत सिंगासने़, पनवेल

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply