पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना व लॉकडाऊन परिस्थितीत भुकेलेल्या अन्न देण्याचे काम पनवेल परिसरात भाजपच्या वतीने केले जात आहे. त्या अनुषंगाने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी गुरुवारी (दि. 28) खारघर येथे गरीब, गरजू लोकांना अन्नवाटप केले. या वेळी स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोना व्हायरस आणि त्यामुळे लागू असलेल्या लॉकडाऊन परिस्थितीत गोरगरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी दानशूर नेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजपच्या वतीने मोदी भोजन कम्युनिटी किचन नावाने मोफत अन्नछत्र सुरू करण्यात आलेले आहे. भुकेलेल्या पोटभर अन्न मिळाले पाहिजे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर स्वतः जातीने लक्ष घालत आहेत. आजपर्यंत तब्बल एक लाख 20 हजारांहून अधिक लोकांची भूक भागविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या माध्यमातून झाले आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …