Breaking News

नेरुळच्या एसटीपी प्लांटमधील चोकअप काढण्यास सुरुवात

भाजपच्या सुहासिनी नायडू यांनी केली होती मागणी

नेरुळ : रामप्रहर वृत्त

नेरुळ येथील एसटीपी प्लांटमधील चोकअप काढण्यास सुरुवात झाली आहे. या संदर्भात भाजप युवती अध्यक्षा सुहासिनी नायडू यांनी मागणी केली होती.

नेरुळ सेक्टर 2 येथे पालिकेचा एसटीपी प्लांट आहे. हा प्लांटमधून दररोज दुर्गंधी येत असून प्लांट चोक अप झालेला असल्याने सिव्हरेज प्लांटसमोर लोकवस्ती असून नागरिकांना या त्रासास सामोरे जावे लागत आहे. तसेच पावसाळा तोंडावर आलेला असताना हा प्लांट स्वच्छ करणे गरजेचे आहे अन्यथा येत्या पावसाळ्यात सर्व सांडपाणी रस्त्यावर येऊन रोगराई पसरण्याची शक्यता असून कोरोनाने नवी मुंबईत हहाकार माजवलेला असताना सिव्हरेज लाईन तुंबून पाणी रहिवाशी भागात येणे म्हणजे कोरोना तसेच साथीच्या इतर आजारांना सारख्या रोगाला आमंत्रण देण्यासारखे आहे.

तसेच या भागात डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे पालिकेने तातडीने ड्रेनेज लाईन व हा प्लांट स्वच्छ करावा, अशी मागणी भाजप युवती मोर्चाच्या अध्यक्षा सुहासिनी नायडू यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त व आमदार मंदा म्हात्रे यांना पत्राद्वारे केली होती. त्यानुसार चोकअप काढण्यात आला आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply