Breaking News

आईच्या पुण्यतिथीनिमित्त वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तूंची दिली भेट

भाजप नेते राजेंद्र पाटील यांची सामाजिक बांधिलकी

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील यांनी त्यांच्या मातोश्री अनुसया हरिचंद्र पाटील यांच्या 13व्या पुण्यतिथीनिमित्त भानघर येथील करुणेश्वर वृद्धश्रमाला अन्नधान्य, फळे, सॅनिटायझर, रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याची औषधे आदी वस्तू सामाजिक बांधिलकी म्हणून भेट दिली. करुणेश्वर वृद्धाश्रमात 40 ज्येष्ठ नागरिक आहेत. कोरोना विषाणू संसर्ग व लॉकडाऊन परिस्थितीचा विचार करता येथील ज्येष्ठ नागरिकांकरिता जीवनावश्यक अन्नधान्य, फळे, रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याची औषधे, सॅनिटायझर आदी महत्वपूर्ण वस्तूंची राजेंद्र पाटील यांनी भेट दिली. सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करण्यात आले. या वेळी तालुका युवा मोर्चाचे सरचिटणीस महेश पाटील, अक्षय पाटील, राहुल पाटील, पुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply