नगरसेविका नेत्रा पाटील यांचे महावितरणला पत्र

खारघर : रामप्रहर वृत्त
खारघरमधील सेक्टर 20 व 21 मधील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी भाजप नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.
नगरसेेविका नेत्रा पाटील यांनी दिलेल्या पत्रामध्ये दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, मागील दोन महिन्यापासून खारघर मधील सेक्टर 20 व 21 मध्ये रात्रीच्या वेळेस एक ते दोन तास वीज पुरवठा खंडित होत असतो. त्याचप्रमाणे सेक्टर 19 मध्ये बहुताश वेळेस एक फेज नादुरुस्त असतो. या विभागातील सहाय्यक अभियंता ह्यांना ह्याबाबतची माहिती देखील दिलेली आहे, परंतु कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसून येत नाही. दि. 27 मे रोजी दोन्ही सेक्टर 20 व 21 जवळपास दोन तास अंधारात होते. सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे, नागरिक घरातच बसुन असल्याने व घरातून कार्यालयीन कामकाज करीत असल्याने वीजेचा वापर देखील होत आहे. तसेच उन्हाळ्यामुळे तापमान वाढीमुळे नागरिक त्रस्त असताना आपल्यामार्फत अजून त्यांना मानसिक त्रास होत आहे. या समस्येवर लवकर योग्य त्या उपाययोजना करून कायमस्वरूपी खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करून रहिवाश्यांना होणार्या त्रासातून मुक्तता करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.