उरण : वार्ताहर
उरण मधील डॉ. अरबाज नवाबुल्लाह पठाण यांनी पंचक्रोशीत अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे नुकतेच शासनाच्या नियमांचे पालन करून सोशल डिस्टन्सिंग ठेऊन मोफत गोळ्यांचे वाटप केले. ह्याचा एक हजार पाचशे जास्त व्यक्तींनी याचा लाभ घेतला.
आयुष मंत्रालय यांच्या शिफारशीनुसार अर्सेनिक अल्बम 30 या होमिओेपॅथिक गोळ्यांचा डोस रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरत असल्यामुळे उरण येथील फिलगुड होमिओपॅथी हेअर अॅण्ड स्कीन क्लिनिक उरणचे डॉ. अरबाज नवाबुल्लाह पठाण (बीएचएमएस ईएमएस कॉस्मेटोलॉजिस्ट अॅण्ड त्रीचोलॉजिस्ट) यांच्या वतीने अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे मोफत वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. उरण शहरातील मस्जिद मोहल्ला, तसेच तालुक्यातील केगाव, नागांव, मोरा, मुळेखंड, बोरी आदी गावांमध्ये मोफत गोळ्या वाटण्यात आल्या त्याचप्रमाणे उरण येथील फिलगुड होमिओपॅथी हेअर अॅण्ड स्कीन क्लिनिक स्वामी विवेकानंद चौक, आपला बाजार, शॉप न.4 जयवंत अपार्टमेंट, हरीपांडव पथ नियाज इंस्टीट्युट ऑफ कॉमर्स अॅण्ड इकॉनोमिक्स उरण-मोरा रोड येथे मोफत गोळ्या दिल्या जातील इच्छुकांनी गोळ्या घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. याकामी अॅड व प्रो. नियाझ पठाण, प्रो. रियाझ पठाण, अॅड. शाहझाद पठाण, सना चौधरी, नदीम शैख (कोळीवाडा), जयेश म्हात्रे (मुळेखंड), गणराज नाखवा (करंजा) आदींनी सहकार्य केले. पुढील काळात सुमारे सात हजार पेक्षा जास्त व्यक्तींना गोळ्या वाटप करण्याचा डॉ. पठाण यांचा मानस आहे. अधिक माहितीसाठी डॉ. अरबाज नवाबुल्लाह पठाण (9224211998) यांच्याशी संपर्क साधावा.