पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 4च्या नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वतीने आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या
अर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथिक गोळ्या आणि मास्कचे रविवारी (दि. 31) ओवे कॅम्प येथील 500 कुटुंबीयांना मोफत वाटप करण्यात
आले.
होमिओपॅथिक गोळ्या आणि मास्कचे मोफत वाटप पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, खारघर तळोजा मंडल भाजप अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष दिलीप जाधव, किरण पाटील, भरत कोंढाळकर, ओवे कॅम्पचे भाजप युवा मोर्चा सरचिटणीस रामचंद्र जाधव, ओवे कॅम्प बूथ अध्यक्ष संतोष रेवने, सुनील साळुंखे, संतोष भातोसे, दीपक साळुंखे यांच्या उपस्थितीत व होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. मयुरेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या वेळी किरण पाटील यांनी सांगितले की, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी सर्व भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हा वाढदिवस लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शिकवणीनुसार सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करतात. यावर्षी देशावर आलेले कोरोनाचे सावट लक्षात घेता समाजातील लोकांना त्यांच्या आरोग्याच्या व सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या होमिओपॅथिक गोळ्यांचे व मास्कचे वाटप माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले. नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस नेहमी लोकहिताचे कार्यक्रम करून साजरा करीत असतो, असे सांगून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. मयुरेश इंगळे यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थांना अर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांबद्दल सविस्तर माहिती दिली.