Breaking News

रायगडात 67 नवे रुग्ण; तिघांचा मृत्यू

पनवेल ः प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 31) कोरोनाचे 67 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याशिवाय अलिबाग, म्हसळा आणि महाडमध्ये कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला असून, 27 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात कोरोना  रुग्णांची संख्या 1117 झाली असून त्यामध्ये एकट्या पनवेल तालुक्यातील 729 रुग्णांचा समावेश आहे, तर जिल्ह्यातील मृतांची संख्या 50 झाली आहे. 

रायगड जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे 67 नवीन रुग्ण आढळले आहेत. अलिबाग, म्हसळा आणि महाडमध्ये कोरोनामुळे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

पनवेल तालुक्यात सर्वाधिक 40 रुग्ण आढळले असून यामध्ये पनवेल महापालिका क्षेत्रातील 30 आणि ग्रामीणमधील 10 रुग्णांचा समावेश आहे. रविवारी म्हसळा 10, मुरूड चार, तळा चार, उरण तीन, माणगाव दोन आणि अलिबाग, रोहा, कर्जत आणि महाडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला.रायगड जिल्ह्यात आतापर्यंत 3882 टेस्ट करण्यात आल्या असून, त्यापैकी 1117 टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. 119 टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर 616 जणांनी मात केली असून, 451 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर जिल्ह्यात 50 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Check Also

खारघर येथे रक्तदान महाशिबिर; आमदार प्रशांत ठाकूर यांनीही दिले योगदान

खारघर ः रामप्रहर वृत्तश्री परशुराम जयंतीचे औचित्य साधून खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रविवारी …

Leave a Reply