माणगाव, रोहा : प्रतिनिधी – माणगाव तालुक्यात सहा नवे रुग्ण आढळले. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 48 झाली आहे. त्यापैकी 14 रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेल्याची माहिती तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांनी दिली. दुसरीकडे रोहे तालुक्यात दोन नवे कोरोना रुग्ण आढळल्याने एकूण आकडा 23वर गेला.
माणगाव तालुक्यातील नव्या रुग्णांमध्ये कोंडेथर गावात तीन आणि विळे, होडगाव व चेरवली गावात प्रत्येकी एकाचा समावेश आहे. रोहा तालुक्यात करंजवीरा येथे एक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. सततच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता व्यक्त होत आहे.