कर्जत ः प्रतिनिधी
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या कर्जत युवा मोर्चा मंडळाकडून मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 34 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फू.र्त प्रतिसाद दिला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत-खालापूर तालुक्यातील 405वे रक्तदान शिबिर सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन रेडक्रॉस सोसायटी मुंबई यांच्या सहकार्याने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कर्जत मंडळाच्या वतीने कपालेश्वर मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन भाजप तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य नरेश मसणे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक बळवंत घुमरे, स्वामीनी मांजरे, विशाखा जिनगरे, जिल्हा सरचिटणीस रमेश मुंढे, तालुका सरचिटणीस राजेश भगत, माजी तालुकाध्यक्ष पंढरीनाथ राऊत, सुनील गोगटे, महिला आघाडी शहराध्यक्ष स्नेहा गोगटे, बिनीता घुमरे, अॅड. योगिनी बाबर, दीपक बेहरे, प्रमोद पाटील, किरण ठाकरे, राहुल कुलकर्णी, मंदार मेहेंदळे, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष मयुरेश शितोळे, आकांशा दुमणे, वर्षा बोराडे, मृणाल खेडकर, सरस्वती चौधरी, सुषमा ढाकणे, गायत्री परांजपे, लीना गांगल, छाया कुलकर्णी आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम माजी तालुकाध्यक्ष नितीन कांदळगावकर यांनी रक्तदान करून रक्तदानाचा शुभारंभ केला. या शिबिराला भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, माजी बांधकाम सभापती पुंडलिक पाटील यांनी भेट दिली. रक्त संकलन इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे डॉ. प्रमोद वझरेकर, सुशीलकुमार हिवाळे, नितीन चव्हाण, जयराम पंडित, दीपक महापदी, विद्या महाबली, त्रिवेणी फुटकन, रणजित निकम, लता झडे, कृष्णा डावरे, वैशाली जांभळे यांनी केले.