Breaking News

गांधी व शास्त्री जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

गव्हाण : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त या दोन्ही थोर देशभक्तांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य राजकुमार चौरे, रयत शिक्षण संस्थेचे लाइफ मेंबर प्रमोद कोळी, लाइफ वर्कर रवींद्र भोईर, आंग्लभाषा अध्यापक सागर रंधवे, प्रा. अर्चना पाटील, ग्रंथपाल महेश म्हात्रे, रयत सेवक डी. आर. ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून दोन्ही ही देशभक्तांच्या प्रतिमांचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

……………………  ……………   ……………….. …………………. …………………….

उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज या शिक्षण संकुलात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती शुक्रवारी (दि. 2) सकाळी 11 वाजता विद्यालयाच्या प्रांगणात सोशल डिस्टन्सिंग पाळून व मास्कचा वापर करून साजरी झाली. भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, कामगार नेते व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या वेळी त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, सत्य, अहिंसा, सत्याग्रह या मार्गाने लढा उभारून आपणास भारतीय स्वातंत्र आणि लोकशाही प्राप्त करून दिली, त्यांच्या या त्यागाची महती त्यांनी सांगितली. तसेच रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर व विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. अरूण घाग यांनी लालबहादूर शास्त्रींच्या प्रतिमेची पूजा करून या महापुरुषांच्या जीवन चरित्राची ओळख करून दिली. तसेच या कार्यक्रम प्रसंगी बेटी बाचाओ – बेटी पाढाओ हा संदेश दिला गेला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नुरा शेख यांनी केले. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते जितू पाटील आणि विद्यालयातील सेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. सुहास शिंदे यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.

Check Also

25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …

Leave a Reply