उरण ः रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघातील आदिवासी नागरिकांना भेडसावणार्या रस्ते, पाणी, वीज, घरकुल आदी मूलभूत सुविधांच्या प्रश्नांबाबत राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांची आमदार महेश बालदी यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
या चर्चेदरम्यान आमदार बालदी यांनी आदिवासी भागातील लोकांच्या अडचणींचा वेध घेत तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मंत्री डॉ. उईके यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, खालापूर मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे तसेच बोरगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रितेश मोरे उपस्थित होते.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper