Breaking News

जागरूक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनहित याचिकेला नागरिकांचा पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी जाणार्‍या कर्मचार्‍यांची अर्थात कोरोना योद्ध्यांची कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था करण्यात यावी, यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेला पनवेल परिसरातील अनेक नागरिकांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे.

पनवेलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पनवेलमध्ये आढळून येणारे बहुतांश रुग्ण हे मुंबई, नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी जाणारे नागरिक आहेत. त्यांच्या कुटुंबातील लोकांनाही संसर्ग होत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी जाणार्‍या कर्मचार्‍यांची कामाच्या ठिकाणी राहण्याची तात्पुरती व्यवस्था करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेली मागणी योग्यच असल्याने तिला माझा पाठिंबा आहे.
-उल्हास शृंगारपुरे, ट्रस्टी, लक्ष्मीनारायण मंदिर, पनवेल  

पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतोय. यात मुंबईला कामानिमित्त जाणार्‍याची संख्या अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मुंबईकरांबद्दल भीती निर्माण झाली आहे. माझा भाऊही मुंबईला असतो. सध्या तो इकडे येत नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आमदार प्रशांत ठाकूर यांची अत्यावश्यक सेवेसाठी जाणार्‍या कर्मचार्‍यांची कामाच्या ठिकाणी राहण्याची तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्याची मागणी योग्य आहे.
 -रंजना गीते, करंजाडे

आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयात कोरोना योद्ध्यांची त्यांच्या कामाच्या ठिकाणीच राहण्याची सोय करावी यासाठी केलेली जनहित याचिका योग्यच आहे. आज आपण पाहतोय की मुंबईला जाणारे, त्यांच्या कुटुंबातील आणि संपर्कातील लोकांना मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत आहे. त्यामुळे पनवेलकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही मागणी अगदी योग्य आहे.
-निरंजन गुप्ते, सुकापूर

अत्यावश्यक सेवेसाठी जाणार्‍या कर्मचार्‍यांनी कामाच्या ठिकाणी राहणे हे पनवेलकरांच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. आज संसर्ग होणार्‍या व्यक्तींमध्ये त्यांची आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची संख्या मोठी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांची अत्यावश्यक सेवेसाठी जाणार्‍या कर्मचार्‍यांची कामाच्या ठिकाणी राहण्याची तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्याची मागणी पूर्णतः बरोबर आहे.
– तायडे, माजी जेएनपीटी कर्मचारी

पनवेल परिसरात मुंबई तसेच इतर ठिकाणी कामानिमित्त जाणार्‍यांना कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. अशा व्यक्ती काही दिवस आपल्या कामाच्या ठिकाणीच वास्तव्यास राहिल्यास त्यांच्या परिवारास आणि इतरांनाही संसर्गाचा धोका कमी होईल. त्यामुळे त्यांनीही काही दिवस कामाच्या ठिकाणीच राहणे योग्य आहे. त्यामुळेच आमदार प्रशांत ठाकूर यांची कोरोना योद्ध्यांची त्यांच्या कामाच्या ठिकाणीच राहण्याची तात्पुरती सोय करावी यासाठी न्यायालयात दाखल केलेली जनहित याचिका योग्यच आहे.  
-श्रद्धा पटेल, अध्यापक

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply