Breaking News

खारघरमधील वटवृक्षाचे पुनर्रोपण

नगरसेविका नेत्रा पाटील यांनी केली अनोखी वटपौर्णिमा

पनवेल : रामप्रहर वृत्त

नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी जागतिक पर्यावरण दिन त्याचबरोबर वटपौर्णिमा अनोख्या पद्धतीने साजरी केली. निसर्ग चक्रीवादळाने खारघरमधील वटवृक्षाचे झाड उन्मळून पडले होते. वटपौर्णिमेला या वडाच्या झाडाचे पुनर्रोपण करुन त्यांनी वटपौर्णिमा साजरी केली. त्यांच्या या कार्याचे स्थानिक नागरिक कौतुक करीत आहेत.

 निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली. खारघर सेक्टर 11 मधील स्नेह सोसायटी समोरील एक वटवृक्षाचे झाड देखील उन्मळून पडले होते. हे झाड त्या ठिकाणच्या रहिवाश्यांनी मागील 10 वर्षापासून लहान मुलासारखे वाढवले होते. संघर्ष समिती खारघरचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव यांनी व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकच्या माध्यमातून नगरसेवक तसेच प्रशासकीय अधिकारी यांना आवाहन करत या वटवृक्षाचे पुनर्रोपण व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. याची दखल घेत प्रभाग क्र.4च्या नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी लगेच सिडको व पनवेल महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी संपर्क करुन त्या वडाच्या झाडाचे पुनर्रोपण करुन घेतले. यासाठी सिडकोच्या उद्यान अधिकारी गीता सावंत, उद्यान पर्यवेक्षक रोहित मेमाने, पनवेल महानगरपालिकेचे स्वछता निरीक्षक जितेंद्र मढवी यांसह किरण पाटील सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, से.11 मधील रहिवासी नानासाहेब जाधव, किशोर क्षीरसागर, तानाजी घाटगे यांचे सहकार्य लाभले.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply