नवीन पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 17 येथे आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारशक्ती वाढविणार्या अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप केले. या वेळी नागरिकांशी संवाद साधून व औषधाबद्दलची माहिती देऊन हे औषध कशा प्रकारे घ्यावे हे सुध्दा सांगण्यात आले.
गरजू महिलांना जीवनावश्यकवस्तूंचे वाटप
मोहोपाडा : प्रतिनिधी
श्री समर्थ संस्था व सिप्ला फाऊंडेशन यांच्या वतीने श्री समर्थ संस्था कार्य करत असलेल्या गरजू एचआयव्ही बाधित रुग्ण व अनाथ अशा जवळपास 100 गरजू महिलांना जीवनावशक वस्तुंचे किट वाटप करण्यात आले.
देशात कोरोना विषाणू महामारी संकटसमयी संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असताना हलाखीचे जीवन जगत असणार्या संस्थेच्या गरजू लाभार्थ्यांना ज्या ज्या माध्यमातून मदत करता येईल त्या-त्या माध्यमातून मदत करण्याचे कार्य संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाटील करीत आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या सुरुवातीलाच संस्थेच्या वतीने मास्क व या आजाराची संपूर्ण माहिती असणारी पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली होती. या वेळी हाताला काम नसल्याने पोटाची भूक भागवणे कठीण झाल्याने संस्थेच्या वतीने गरजू लाभार्थ्यांना यापुढे ही मदत सुरूच ठेवणार असल्याचे अरविंद पाटील यांनी सांगितले.