Breaking News

आमदार मंदा म्हात्रे यांनी केला मान्सूनपूर्व पाहणी दौरा

नवी मुंबई : बातमीदार – राज्यात कोणत्याही क्षणी मान्सून दाखल होणार असल्याने आमदार मंदा म्हात्रे यांनी अरेंजा कॉर्नर वाशी येथील मान्सून पूर्व कामांचा पाहणी दौरा केला.

अरेंजा कॉर्नर येथील नाल्याच्या कामाची पाहणी केली. धिम्यागतीने सुरू असलेली कामे तसेच अर्धवट अवस्थेतील ठेवण्यात आलेली सर्व कामे त्वरित पूर्ण करण्याबाबत महापालिका प्रशासनास सूचित करण्यात आले.  येत्या दोन दिवसांत सर्व कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त तुषार पवार यांनी सांगितले. या वेळी माजी स्थायी समिती सभापती संपत शेवाळे,  उपायुक्त डॉ. तुषार पवार, घनकचरा व्यवस्थापन अधिकारी  मिलिंद आंबेकर, तसेच भाजपचे विकास सोरटे, महिला मोर्चा महामंत्री  कल्पना छत्रे तसेच असंख्य नागरिक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, नवी मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या मान्सून पूर्व कामांचा वाशी सेक्टर-17 पासून मी पाहणी दौरा सुरू केला असून वाशी सेक्टर-17 येथे सर्वात मोठा असलेला नाल्यामध्ये पावसाळ्यामध्ये समुद्राचे पाणी विरुद्ध दिशेने येत असल्याने सदर नाल्यातील संपूर्ण गाळ काढून ते स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत समाधानकारक कामे सुरू आहेत. सध्या कंपन्या बंद असल्याने चांगले पर्यावरण पूरक वातावरण निर्माण झाले आहे, परंतु कंपन्यातून निघणारे केमिकलचे पाणी शुद्ध करून नदीत सोडणे आवश्यक आहे, ज्या केमिकल कंपन्या पर्यावरण विरोधात कार्य करीत असतील अशा कंपन्यांना नोटीस बजावण्यात आल्या पाहिजेत. सध्या पर्यावरणाचा समतोल राखणे महत्वाचे आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply