Breaking News

नेरुळमध्ये घरांवर झाड कोसळले

नवी मुंबई : बातमीदार – नेरुळ सेक्टर 2 येथील वारणा कॉलनीतील दोन घरांवर  शनिवारी (दि. 6) सकाळी झाड कोसळले. त्यामुळे रहिवाशांची पुन्हा एकदा भंबेरी उडाली. कुटुंबीय घरात नसल्याने कोणासही दुखापत झाली नाही. 

वारणा कॉलनीतील रहिवाशी झोपेतून जागे होत असतानाच सकाळी 7 च्या दरम्यान मोठा आवाज ऐकू आला. कॉलनीतील दोन घरांवर झाड कोसळले होते. रहिवाशांनी तातडीने भाजप सामाजिक कार्यकर्त्या सुहासिनी नायडू यांना कळवले. नायडू यांनी तातडीने पालिका उद्यान अधिकार्‍यांना बोलावून झाड कापून रस्ता मोकळा करण्यात आला. सुदैवाने या दोन्ही घरांतील कुटुंबिय गावी गेले होते. मात्र घराचे पत्रे तुटून किरकोळ नुकसान झाले. काही दिवसांपूर्वी निसर्ग वादळाच्या तडाख्याने भला मोठा वटवृक्ष कोसळल्याने याच वारणा सोसायटीतील घरांचे नुकसान झाले होते. तसेच रस्ता बंद झाल्याने 25 जण अडकले होते. ही घटना ताजी असतानाच, पुन्हा एकदा झाड कोसळल्याने नागरिक भयभीत झाले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply