Breaking News

पॅन कार्डच्या नियमात होणार मोठे बदल

नागपूर : प्रतिनिधी : प्राप्तिकर विभागाने पॅन कार्डच्या नियमात तीन मोठे बदल केले आहेत. येत्या 1 एप्रिलपासून हे बदल होणार आहेत. पॅन कार्ड आधार कार्डला अद्यापही लिंक केलेले नसेल, तर अनेक अडचणी उद्भवू शकतात. आधारला पॅन न जोडल्यास आयटी कलम 139(ए) अंतर्गत ते निष्क्रिय समजले जाईल.

प्रत्यक्ष कर संचालक मंडळांनी आधारला पॅन कार्ड लिंक करण्याची मर्यादा वाढवून 31 मार्च 2019 पर्यंत केली आहे. प्राप्तिकर विभागानुसार आर्थिक वर्षांत 2.5 लाखाहून अधिकची पैशांची उलाढाल असल्यास पॅन कार्ड काढणे गरजेचे आहे. येत्या 31 मे पर्यंत पॅन कार्डसाठी अर्ज करता येईल. नव्या पॅन कार्डवर अर्जदाराचे नाव, त्याच्या आईवडिलांचे नाव, जन्मतारीख आणि पॅन नंबरशिवाय क्यूआर कोडही असणार आहे. क्यूआर कोडमध्ये अर्जदाराचे छायाचित्र आणि स्वाक्षरीसोबतच इतरही माहिती पॅन कार्डवर उपलब्ध असणार आहे. ही माहिती डिजिटल साइंड आणि कोडेड राहील. पॅन कार्ड स्कॅन करून देखील माहिती उपलब्ध करून घेता येईल.

नव्या पॅन कार्डवर छायाचित्र, स्वाक्षरी, होलोग्राम आणि क्यूआर कोडची जागा बदलण्यात आली आहे. तो आता ई-पॅनमध्येही मिळेल. हा क्यूआर कोड विशेष भ्रमणध्वनी अ‍ॅपच्या माध्यमातून स्कॅन करता येईल. गुगल प्ले स्टोअरवरही ते उपलब्ध आहे, मात्र हा कोड स्कॅन करण्यासाठी 12 मेगापिक्सल किंवा त्याहून अधिक चांगल्या कॅमेर्‍याची गरज आहे. नव्या डिझाईनमधील पॅन कार्ड आल्यानंतर 7 जुलै 2018 पूर्वी जारी करण्यात आलेले पॅन कार्डही कार्यरत राहणार आहेत. नवीन पॅनकार्डसाठी अर्ज करत असताना आईवडील घटस्फोटीत असल्यास वडिलांचे नाव देणे आता बंधनकारक असणार नाही. प्राप्तिकर विभागाने एका अधिसूचनेच्या माध्यमातून प्राप्तिकरच्या नियमात संशोधन केले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply