Breaking News

निसर्ग भ्रमंती मंडळाकडून वृक्षारोपण

कर्जत ः बातमीदार

कर्जतच्या कचेरी टेकडीवर ओम निसर्ग भ्रमंती मंडळाच्या माध्यमातून हिरवाई निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चक्रीवादळात ज्या भागात झाडे कोसळली, त्या जिल्हा परिषद विश्रामगृह परिसरात 50 मोठ्या झाडांची लागवड करण्यात आली.

कर्जतच्या तहसील टेकडीवर ओम निसर्ग मैत्री भ्रमंती परिवाराच्या वतीने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टेकडीवरील उप जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात तसेच बाहेरील बाजूस वेगवेगळ्या 50 मोठ्या रोपांची लागवड करण्यात आली. आंबा, जांभूळ, चिंच, मोह, फणस, बेल आदींची लागवड करण्यात आली. या परिवारातर्फे आजवर गेली 10 वर्षे मोजकीच झाडे लावून त्यांचे संवर्धन केले जाते. चक्रीवादळाच्या तडाख्यात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. अशा वेळी वृक्षारोपणाची खरी गरज ओळखून जिल्हा परिषद कार्यालयातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सदानंद मते यांनी स्वखर्चाने 10 आंब्याची झाडे कार्यालय आवारात लावली. या वेळी राजू पोतदार, दिलीप कदम, जयंत पाटकर, महेंद्र पाटील, श्रीकांत ओक, संदीप शिंदे, विजय कडू, दिनेश मुसळे, पी. के. देशमुख, सदानंद मते, रामकुमार गुप्ता, सोनिया गरवारे, दीपक कुलकर्णी, नेहा कदम, विहंग परब, अ‍ॅड. सी. बी. ओसवाल, अ‍ॅड. नरेश बैलमारे, नीता बैलमारे, मुश्तान कर्जतवाला आणि त्यांचे पुत्र, निलेश अत्रे, बाळा दानवे, आशिष कोल्हे तसेच मॉर्निंग वॉकला येणार्‍या नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे पालन करून वृक्षारोपण केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply