Breaking News

आता संयम सुटू लागला!

सहा दिवस अंधार, पाणी प्रश्न गंभीर

अलिबाग : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळ निघून गेले पण आता मागे बर्‍याच समस्यांना तोंड दयावे लागत आहे. गेली सहा दिवस अंधारात काढणार्‍या अलिबाग तालुक्यातील बाधीत ग्रामस्थांनी आजवर दाखविलेला संयम सुटण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान तालुक्यातील सारळ पुलावर त्याची थोडी झलक सोमवारी सकाळी पहायला मिळाली. पण पोलिसांच्या उपस्थितीमुळे उपस्थित ग्रामस्थांनी वीज यंत्रणेच्या अधिकार्‍यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली.

निसर्ग वादळाचा फटका अलिबागला ही चांगलाच बसला. सर्वाधिक हानी बागायतदार, आणि वीज यंत्रणेची झाली. परिणामी गेली सहा दिवस तालुक्यातील अनेक गावे अंधारात चाचपडत आहेत. त्यापैकी सारळ, नवखार, बागदंडा, बेलपाडा, रेवस, फुफादेवीपाडा, कवाडे, मोरा, आदी अनेक गावांचा समावेश आहे. वादळा नन्तर दोन दिवसांनी ज्या गावात कमी नुकसान झाले त्या गावांचा वीज पुरवठा सुरळीत झाला पण आजही बरीच गावे अंधारात आहेत.

आपल्या नजीकच्या गावात वीज आहे मग आपल्या गावात का नाही असा प्रश्न उपस्थित झाला आणि या प्रश्नाचे उत्तर मागण्यांसाठी  सारळ, नवखार आदी गावातील ग्रामस्थ आज सकाळी सारळपुलावर एकत्र आले. तेथील वीज मंडळाच्या  अधिकार्‍यांना त्यांनी त्या बाबत विचारणा केली. या वेळी मांडवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके, आणि काही पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

वीज नसल्याने रात्री अंधार तर सहन करावा लागतोच पण सर्वात बिकट समस्या नाही पाण्याची निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थ अधिक बेचैन झाले आहेत. एकूणच गंभीर परिस्थितीची जाणीव सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सोनके यांनी वीज मंडळाच्या अधिकार्‍यांना करून दिली.

ग्रामस्थांनी ही वीज मंडळांला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी आटोक्यात आली. गावकरी आणि अधिकारी एकत्र आल्याने एक दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत होईल, असा आशावाद निर्माण झाला आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply