Breaking News

उरण नगरपरिषदेच्या कर्मचारी व वीज वितरण मंडळाचे कौतुक

उरण : वार्ताहर – निसर्ग चक्रीवादळाने उरण तालुक्यात पत्रे, मोठे वृक्ष पडलेले होते. त्यातच बर्‍याच ठिकाणी विजेचे खांब वाकले काही ठिकाणी विजेच्या तुटल्या अशा अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. उरण शहरातील नगरपरिषद हददीतील अनेक ठिकाणी वीज खंडित झाली होती. त्यामध्ये उरण नगरपरिषदेचे कर्मचारी व वीज वितरण कंपनीचे कर्मचारी यांनी पाणी व वीज पुरवठा कमी वेळेत चालू केला. त्या बद्दल नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

उरण शहरातील लाल मैदान, बोरी नाका, आनंद नगर, कामठा रोड, विमला तलाव, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय समोर, देऊळ वाडी नाका आदी ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या होत्या. उरण नागरपरिषदेच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन्द्र कोळी, भाजप शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक रवी भोईर, राजेश ठाकूर, धनंजय कडवे, मेराज शेख तसेच नगरसेविका दमयंती म्हात्रे यांनी वीज वितरण मंडळास या विषयी सांगितले. त्या अनुषंगाने वीज वितरण मंडळाचे मुख्य अभियंता चोंडी, अभियंता झळके व त्यांची टीमने कमीत वेळेत वीज पुरवठा सुरु केला.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply