Breaking News

उरणमध्ये राजस्थान वैष्णव मित्र मंडळाचा होळी महोत्सव

उरण : वार्ताहर : उरण येथील राजस्थान वैष्णव मित्र मंडळातर्फे होळी महोत्सव 2019चे आयोजन संस्थापक अध्यक्ष महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार (दि. 22) मार्च रोजी सायंकाळी 6 ते 10पर्यंत उरण एज्युकेशन सोसायटी स्कूल बोरी, उरण येथे करण्यात आले होते.

सुमारे तीन हजार राजस्थान वैष्णव समाजाचे बांधव व मित्र परिवार या होळी महोत्सवात सहभागी आले होते. यंदाचे 13वे वर्ष आहे. उरण शहरातील राजस्थान वैष्णव समाजाचे बांधव एकत्र येऊन आनंदाने होळी सण सजरा करतात, असे राजस्थान वैष्णव मित्र मंडळ उरणचे उपाध्यक्ष गणेश सेवक (गुजर) यांनी सांगितले. या वेळी होळी महोत्सवामध्ये होळीविषयी गाण्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. सर्वांनी गाण्यांचा भक्तिभावाने आनंद घेतला. सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी राजस्थान वैष्णव मित्र मंडळ उरणचे संस्थापक अध्यक्ष महेश बालदी, उपाध्यक्ष गणेश सेवक (गुजर), नरपत सिंह, शिवसिंह खरवड, लक्ष्मण सेवक, मोहन सिंह, कनैया सुवर्णकार, मोटासिंह खरवड, किसन गुजर, पुरषोत्तम सेवक, जगदिश सेवक, अंबासिंह, कनैया सोनी, पुखराज सुथार, मांगीलाल गुजर, सोहन गुजर, पृथ्वीराज, देवा सिंह आदी कमिटी सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात मेहनत घेतली, तसेच उरण शहरातील नगरसेवक कौशिक शहा, राजेश शहा, संतोष ओटावकर, नगरसेवक राजेश ठाकूर, सुनील पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

‘गीतगंधाली’तून उलगडला कर्मवीर अण्णांचा जीवनपट

सातारा येथील कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती सातारा : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त कर्मवीर …

Leave a Reply