नांडेद : प्रतिनिधी
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत पक्षाचे मुंबई शहर अध्यक्ष आमदार भाई जगताप यांना धक्काबुक्की झाली आहे. हा प्रकार कॅमेर्यात कैद झाला.
खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडा यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असून ही यात्रा बुधवारी (दि. 9) नांदेडच्या शंकर नगरमधून पुढे रवाना झाली. यात्रा पुढे मार्गक्रमण करीत असताना काँग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष आमदार भाई जगताप यांना धक्काबुक्की झाली. विशेष म्हणजे राहुल यांच्या सुरक्षारक्षकाकडून जगतापांना मागे ढकलण्यात आले. त्यामुळे जगताप यांचा तोल गेल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे.
Check Also
भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …
RamPrahar – The Panvel Daily Paper