
पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल तालुक्यात 36 नवीन रुग्ण 26 जणांची कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (दि. 10) कोरोनाचे 26 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 21 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर पनवेल ग्रामीणमध्ये 10 नवीन कोरोनाबाधित आढळले असून पाच रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
महापालिका हद्दीतील कामोठेमध्ये 16, खारघर तीन, पनवेल चार, कळंबोली एक, नवीन पनवेल एक आणि तळोजामधील एका रुग्णाचा समावेश आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 817 रुग्ण झाले असून 541 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 66.22 टक्के आहे. 248 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 36 जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीणमध्ये नांदगाव एक, कुंडेवहाळ एक, उलवे दोन, विचुंबे तीन, नेरे दोन आणि करंजाडे येथील एका रुग्णाचा समावेश आहे तर दापीवली एक, उसर्ली खुर्द दोन, करंजाडे आणि विचुंबे येथील प्रत्येकी एक रुग्ण बरा झाला आहे. दरम्यान उरणमध्ये कोरोना पॉझिटिव्ह एक रुग्ण आढळला आहे.