Breaking News

…तर विराट कोहलीने माझीही धुलाई केली असती! वॉर्नकडून ‘अनोखे’ कौतुक

सिडनी : वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले आहे. जर विराट कोहली आपल्या काळात फलंदाजीसाठी मैदानात उतरला असता; तर त्याने माझी सहज धुलाई केली असती, असे वॉर्नने म्हटले आहे. तो इंडिया टुडे वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

मी आतापर्यंत अनेकदा विराट कोहलीविरुद्ध गोलंदाजी केली आहे. एक-दोन वेळेला मी त्याला बादही केलेय. माझ्या मते वयाच्या 15व्या वर्षी विराटने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. मला खात्री आहे, जर माझ्या काळात विराट फलंदाजीसाठी मैदानात आला असता; तर त्याने माझीही धुलाई केली असती. मी विराटचा मोठा चाहता आहे. क्रिकेटसाठी त्याची निष्ठा ही नक्कीच वाखणण्याजोगी आहे. तो एक उत्तम कर्णधारही आहे, अशा शब्दांत वॉर्नने कोहलीचे कौतुक केले. ट्वेन्टी-20 आणि वन डे क्रिकेटच्या काळातही विराट कोहली तितक्याच चांगल्या पद्धतीने कसोटी क्रिकेट खेळतो. या कारणासाठी विराटबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये एक खेळाडू म्हणून तुमचा खर्‍या अर्थाने कस लागतो, कोहलीचे कौतुक करताना वॉर्न बोलत होता. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

Check Also

केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवा -मंत्री आदिती तटकरे

माणगाव : प्रतिनिधी महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ श्रीवर्धन विधानसभा …

Leave a Reply