खारघर : प्रतिनिधी
होळी सणाच्या निमित्ताने खारघर हिलच्या पायथ्याशी होळी चषक 2019 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन गुरुवारी (दि. 21) करण्यात आले होते. या स्पर्धेत 10पेक्षा जास्त संघानी सहभाग घेत प्रतिसाद दिला.
धूळवडीच्या दिवशी आनंद द्विगुणित करण्यासाठी नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते झाले. या वेळी नगरसवेक नरेश ठाकूर, दीपक शिंदे, सुरेश ठाकूर, सुधाकर तोडेकर, रतन भोईर यांच्यासह पंचक्रोशीतील खेळाडू व क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते.