Breaking News

उरण पालिकेने तातडीने बुजविले रस्त्यांमधील खड्डे

उरण : वार्ताहर

उरण नगर परिषदेच्या हद्दीत रस्त्यामध्ये लहान-मोठे खड्डे पडले होते ते तातडीने बुजविण्यात आले आहे. नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह यांच्या मार्गदर्शनाखाली उरण शहरातील रस्त्यात पडलेले खड्डे बुजविण्यात आले. नागरिक नगर परिषदेच्या सर्व नगरसेवकांना धन्यवाद देत आहेत. उरण नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र. 9 व प्रभाग क्र. 10 मधील असलेल्या रस्त्यांमध्ये ठिक-ठिकाणी लहान-मोठे खड्डे पडलेले होते. खड्ड्यांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांना त्रास होत असे. नगराध्यक्ष सायली म्हात्रे व नगरसेवक राजेश ठाकूर यांनी पाठपुरावा करून खड्डे बुजवून घेतले. या कामाच्या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, प्रभाग क्र. 10चे नगरसेवक राजेश ठाकूर, महेश फारड, प्रभाग क्र.10 सनद पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply