Breaking News

मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करावीत

नगरसेविका सुशिला घरत यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त – पावसाळा सुरु झाला तरीही नविन पनवेलमधील अद्याप काही ठिकाणी सिडकोने मान्सूनपूर्व कामे पूर्ण केली नाहीत, त्यामुळे ती कामे तातडीने करावीत, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेतील भाजपच्या नगरसेविका सुशिला जगदीश घरत यांनी सिडकोकडे केली आहे.

सुशिला घरत यांनी या संदर्भात यापूर्वीच निवेदन देऊन मान्सूनपूर्व कामे करण्याची मागणी केली होती. मात्र सिडकोकडून दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सिडकोचे याकडे लक्ष केंद्रित केले आहे.  सी 5 सेक्टर क्रमांक 18 मधील बिल्डिंग क्रमांक 1 ते 4 येथे साइड गटार असल्याने बिल्डिंग क्रमांक 5 ते 8 बाजूच्या रस्त्याची उंची वाढवीण्यात आली आहे आणि आता त्यामुळे बिल्डिंग क्रमांक 5 ते 8 येथील आतील आवारात पाणी साठत आहे, असेही त्यांनी सिडकोचे अभियंता श्री नहाने, श्री. गौरव, उपअभियंता गिरीश घरत यांची भेट घेऊन हि बाब निदर्शनास आणून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

त्याचबरोबर सेक्टर 13, 14, 17, व 18 मधील नालेसफाई करण्याचीही मागणीही केली आहे. यावर सिडकोच्या अधिकार्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply