नगरसेविका दर्शना भोईर यांचे निवेदन
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व प्रभागांमध्ये भारत गॅसची सुविधा घरपोच देण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी भारत गॅसच्या पनवेल शाखेकडे निवेदन दिले आहे.
नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, पनवेल महानगरपालिकेतील सर्व प्रभागांमध्ये कोविड-19 या विषाणूच्या प्रादुर्भावावर नियंत्रण करण्याकरीता व नागरिकांची गैरसोय होऊ नये व नागरीकांना गॅस घेण्याकरीता तात्कळत रांगेत उभे राहू नये याकरीता भारत गॅसची सुविधा घरपोच करण्यात यावी. यासाठी भारत गस प्रा. लि.. या कंपनीद्वारे तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, जेणेकरुन पनवेल महानगरपालिका हद्दीतील ज्येष्ठ नागरीकांना व महिलांना वजन उचलण्यास त्रास सहन करावा लागणार नाही. तसेच एचपी गॅस कंपनीने गॅस घरपोच देण्याची यंत्रणा चालू केल्याचे दिसून येत आहे. वरील विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व प्रभागांमध्ये आपल्या भारत गॅस कंपनी मार्फत गॅस घरपोच देण्याची सुविधा तातडीने करावी, अशा मागणीचे निवेदन भारत गॅस कंपनीच्या पनवेल शाखेला देण्यात आले आहे.