Breaking News

मालडुंगे ग्रामपंचायत हद्दीतील वाड्यांमध्ये वस्तूंचे वाटप

पनवेल : वार्ताहर

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रेरणेने, आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रोत्साहन आणि तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती फाऊंडेशनच्या माध्यमातून रविवारी तालुक्यातील मालडुंगे ग्रामपंचायत हद्दीतील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये धामणी लहान, धामणी मोठी, मालडुंगे, धोधाणी, टॉवर वाडी, ताडपटी असे जवळपास 300 कुटुंबीयांना वस्तू देण्यात आल्या.

या वेळी वरुण मुदीता, निहारीका, रुषभ, दर्शन यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमात भाजप पदाधिकारी ज्योती नागेश देशमाने, पनवेल शहर मंडळ वैद्यकीय सेल संयोजिका, राज पाटील पंचायत समिती सदस्य, राजेश भोईर विभागीय अध्यक्ष युवा मोर्च नेरे विभागीय अध्यक्ष सागर पाटील मालडुंगे ग्रामपंचायत सरपंचहर्षदा चौधरी माजी जिल्हा परिषद सदस्य चाहूशेठ चौधरी, माजी सरपंच जोमा निरगुडा, मालडुंगे ग्रामपंचायत सदस्य जनार्दन निरगुडे आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply