मोहोपाडा ः प्रतिनिधी
राष्ट्रीय संस्था रँकिंग फ्रेमवर्क मानव संसाधन विकास मंत्रालय यांच्याकडून जाहीर झालेल्या एनआयआरएफच्या रँकिंगमध्ये टॉप दोनशेच्या यादीत सेंट विल्फ्रेड्स कॉलेजने आपले नाव नोंदविले आहे.
सेंट विल्फ्रेड्स कॉलेजने आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि बीसीए या उत्कृष्ट शैक्षणिक रेकॉर्ड, प्लेसमेंट, शिकवण्याची पद्धत, उत्कृष्ट निकाल, शिकवण्याची गुणवत्ता, शिस्त, पायाभूत सुविधा आणि परिणामी मजबूत प्रतिमेमुळे हे यश साध्य केले आहे. सेंट विल्फ्रेड्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. केशव बडाया यांनी सांगितले की, मागील वर्षीदेखील संस्था एनआयआरएफच्या टॉप 200च्या यादीत होती. संस्थेने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचे काम केले आहे. एमएचआरडीच्या उच्च शैक्षणिक संस्थांच्या रँकिंगकडून (एनआयआरएफ) मिळालेल्या या यशामुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत शिक्षक-कर्मचार्यांमध्येही सकारात्मक संदेश गेला आहे. त्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, शेडुंगचे कुलगुरू डॉ. ए. के. सिन्हा आणि विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आर. पी. शर्मा यांनी सेंट विल्फ्रेड्स कॉलेजला यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.