पनवेल : रामप्रहर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या ’माय लाईफ माय योगा’वर आधारित रेकॉर्डेड व्हिडीओ 2020 स्पर्धा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष प्रभाग 19च्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धा पनवेल महापालिका क्षेत्रासाठी मर्यादित असून, सहा गटांत होणार आहे. प्रत्येक गटासाठी पारितोषिके देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकास 5555 रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 3333 रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक 2222 रुपये व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांकास 1111 रुपये व आकर्षक चषक अशी एकूण 80 हजार रुपयांची बक्षिसे आहेत. स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 19 जून असून, स्पर्धकाने आपला सूर्यनमस्काराचा तीन मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करून 7502100100 किंवा 7757000000 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करावा. स्पर्धेतील विजयी स्पर्धकांचा व्हिडिओ 21 जून या जागतिक योग दिनी फेसबुक पेजवर प्रसारित केले जाणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …