Breaking News

मुंबई-गोवा महामार्गावर ट्रकने घेतला पेट

पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर

मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा खिंड सोडल्यावर उतारावर पेण बाजूकडून पनवेल बाजूकडे येत असलेल्या मालाने भरलेल्या ट्रकने पेट घेतल्याची घटना बुधवारी (दि. 17) सकाळी घडली. या मध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे समजते.मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत कर्नाळा खिंड सोडल्यावर पनवेल बाजूच्या उतारावर हॉटेल क्षणभर विश्रांती जवळ पेण बाजूकडून पनवेल बाजूकडे येत असलेल्या ट्रकने सकाळी 10.30च्या सुमारास अचानक पेट घेतला. या ट्रकमध्ये कोळसा असल्याचे समजते. त्यामुळे वार्‍याने आग लगेच भडकली आगीच्या ज्वाळा दिसताच स्थानिकांनी पळस्पे वाहतूक पोलीस शाखा, तालुका पोलीस ठाणे व अग्नीशमन दलाकडे संपर्क साधला. पळस्पे वाहतूक पोलीस शाखा आणि अग्नीशमन दलाने तातडीने घटनास्थळी येऊन आग विझवली. ट्रकचे नुकसान झाले.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply