Breaking News

नागोठण्यात कोरोना रुग्ण आढळल्याने आजपासून चार दिवस बाजारपेठ बंद

नागोठणे : प्रतिनिधी
शहरासह विभागात कोरोनाचे चार रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागली असून, दुसरीकडे गुरुवार ते रविवार असे चार दिवस येथील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे.
नागोठणे शहरातील एका 51 वर्षीय व्यक्तीसह बेणसे येथील 34 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यापूर्वी रिलायन्स निवासी संकुलात राहणार्‍या 57 आणि 53 वयोगटातील दोन व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यातील नागोठण्यातील व्यक्ती रोहे तालुका, तर उर्वरित तीन कोरोनाग्रस्त पेण तालुक्याच्या अंतर्गत येत असून, दोन्ही तालुक्यांच्या शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. येथील ग्रामपंचायत कार्यालयात आरोग्य अधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांच्यात तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर तातडीने व्यापारी संघटनेची बैठक झाली. या बैठकीत खबरदारीची उपाययोजना म्हणून गुरुवारपासून रविवारपर्यंत येथील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. औषधांच्या दुकानांना यातून वगळण्यात आले आहे, तर दूध विक्रीच्या दुकानांना सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. या काळात उघड्या दुकानांवर दोन हजार रुपये आणि मास्क न घालता बाहेर फिरणार्‍या व्यक्तींवर 200 रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी स्पष्ट केले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply