रोहे : प्रतिनिधी – रोह्यात गुरुवारी (दि. 18) सकाळपासुनच रिमझिम पाऊस पडत होता. परंतु 5.45 पासुन रोह्यात ढगांच्या कड कडाटासह मुसळधार पाऊस पडला आहे. संपुर्ण वातावरण पाउसमय व काळोखमय झाले होते.
रोह्यात गुरुवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली ढगांचा कडकडाट सह जोरदार पाऊस पडल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. तासभर पावसाचा जोर राहिल्याने वीज प्रवाह खंडित झाले. पावसामुळे हवेत गारवा आला असुन दिवसभर पडत असलेल्या पावसाचे सायंकाळी मुसळधार पावसात रुपांतर झाले .
रोहा शहरासह भुवनेश्वर, वरसे, धाटाव विभाग, यशवंतखार, मेढा व चणेरा विभागात गुरुवारी सायंकाळी जोरदार पाऊस पडला आहे.