Breaking News

नागोठण्यात शुकशुकाट

नागोठणे : प्रतिनिधी – मंगळवारी रात्री उशिरा शहरातील एका व्यक्तीचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे वृत्त कळल्यावर बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत गुरुवारपासून रविवारपर्यंत शहरात जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या जनता कर्फ्युला गरुवारपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी औषधांची दुकाने वगळता 100 टक्के दुकाने बंद ठेवून या निर्णयाला प्रतिसाद देण्यात आला. तर, घेतलेल्या निर्णयाप्रमाणे दूध विक्रीची दुकाने सकाळी सहा ते दहाचे दरम्यान उघडी ठेवण्यात आली होती. याबाबत सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांना विचारले असता, नागोठण्यातील सर्व दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवल्याबद्दल समाधान व्यक्त करताना पुढील तीनही दिवस दुकानदार सहकार्य करतीलच असा आशावाद त्यांनी स्पष्ट केला. मात्र, नियमांचे पालन न केल्यास दुकानदाराला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply