Breaking News

धाकटा खांदा येथे आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त

रोटरी क्लब ऑफ बिझनेस एमराल्ड, मानसरोवर यांच्या विद्यमाने पनवेलमधील श्री गणेश विद्या मंदिर प्राथमिक शाळा क्रमांक-6 धाकटा खांदा येथे रविवारी (दि. 3) सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ई.सी.जी., बी.एम.डी.फॉर बोन डेन्सिटी, रँडम ब्लड शुगर या सर्व टेस्ट करण्यात आल्या. सदर आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

शिबिरामध्ये रोटरी क्लब प्रेसिडेंट व स्वामी कृपा नर्सिंग होमचे मालक डॉक्टर मुकुंद तलाठी, रोटरी क्लब सेक्रेटरी रवींद्र अग्रवाल, खजिनदार उमेश लोहार, विहान हॉस्पिटल, कामोठेचे डॉक्टर सुधीर आणि डॉक्टर प्रदीप साई द्वारका हॉस्पिटल, कामोठेचे मालक डॉक्टर हेमंत पाटील आणि डॉ. दीपक खोत यांनी रुग्णांची तपासणी केली. या वेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा प्रभाग क्रमांक 14चे नगरसेवक मनोहर म्हात्रे, सुरेश टेंबे, भास्कर भगत, अर्जुन भगत, रवींद्र डोंगरे, संजय पाटील, विनोद भगत, भगवान पाटील, एकनाथ पाटील, परशुराम डोंगरे, सुकाजी भगत, नितेश म्हात्रे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply