उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील पाणजे येथील खाडीत पाणथळ जागेत फ्लेमिंगो पक्ष्यांचा मुक्काम पावसाळ्यातही वाढला आहे.
कोरोना संसर्गजन्य विषाणू व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रस्त्यावर चालणारी वाहने, माणसांचा कमी झालेला वावर यामुळे प्रदूषण कमी होण्याला मदत झाल्याने निसर्गातील सर्वच पशुपक्षी यांना मुक्त संचार करण्याची संधी प्राप्त झाली. फ्लेमिंगो हे परदेशातील पाहुणे पक्षी असून, अतिशय चाणाक्ष पक्षी असून, त्यांना चौथ्या बंदराच्या बाजूला असलेल्या पाणजे गावालगत असलेल्या पाणथळ जागा असलेल्या खाडीत फ्लेमिंगो पक्ष्यांना आवश्यक असलेले त्यांचे अन्न भक्ष्य खेकडा, मासे व अन्य प्रकारचे खाद्य मिळत असल्याने पाणजे खाडीत फ्लेमिंगो मुक्काम अधिक प्रमाणात वाढला असून,शेकडो फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे या पाणजे खाडीत त्यांचे खाद्य मिळविण्यासाठी मुक्त संचार करताना दिसत आहेत.