Breaking News

माणगाव तालुक्यात पाच नवे कोरोना पॉझिटिव्ह

दोन वैद्यकीय अधिकार्‍यांचा समावेश

माणगाव : प्रतिनिधी – माणगाव तालुक्यात पाच नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, यापैकी दोन रुग्ण माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 11वर पोहोचली असल्याची माहिती तहसीलदार प्रियंका-आयरे कांबळे यांनी दिली.

माणगाव येथील तीन, तर इंदापूर व पन्हळघर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यात आतापर्यंत 25 गावांतून 63 कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी 51 रुग्ण ठणठणीत बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. सद्यस्थितीत 11 सक्रिय रुग्ण आहे.

पेण तालुक्यात रुग्णसंख्या 26वर

पेण : प्रतिनिधी – पेण तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, बुधवारी यात 12ने वाढ झाली, तर गुरुवारपर्यंत आणखी तीन रुग्ण वाढले. त्यामुळे रुग्णसंख्या 26 झाली आहे. या रुग्णांना पनवेल, नवी मुंबई येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. 

पावसाळ्यात पेण तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. काही लोक मात्र बाजारपेठ, दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. शहरी व ग्रामीण भागात गाड्यांची वर्दळही वाढल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वाढत आहे.

पेण उपजिल्हा रुग्णालयात व्यक्तीचा मृत्यू

पेण : प्रतिनिधी – पेण उपजिल्हा रुग्णालयात विश्वनाथ चव्हाण या व्यक्तीचा मृत्यू झाला असून, त्यांच्या नातेवाईकाचा पेण पोलीस तपास करीत आहेत.

याबाबत माहिती अशी की, विश्वनाथ चव्हाण (वय 25), उंची 167 सेंटीमीटर, अंगाने सडपातळ, केस काळे, अंगात फुल टी-शर्ट, रंग सावळा असे या व्यक्तीचे वर्णन आहे. त्याला पेण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, जर कोणाला मयत व्यक्तीबद्दल माहिती असल्यास त्यांनी पेण पोलिसांशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply