Breaking News

विजेच्या धक्क्याने तरुण मृत्युमुखी

कळंबोली : प्रतिनिधी

तोंडरे येथे विजेचा शॉक लागून 20 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वैभव सिंग राजपूत असे तरुणाचे नाव असून तो तोंडरे गावात वास्तव्यास होता. वैभव बुधवारी (दि. 4) सकाळी 8च्या सुमारास आपल्या किराणा मालाच्या दुकानाचे शटर उघडण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी मीटरची वायर ब्रेक झाली होती. दुकानाचे शटर उघडताना त्याला या वायरमधून विजेचा जोरदार शॉक बसला. त्याला कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांकडून त्याला मृत घोषित करण्यात आले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply