पनवेल : रामप्रहर वृत्त
नुकत्याच झालेल्या वादळाने उध्वस्त झालेल्या काही पाड्यांना पेण येथील ब्राह्मण सभा व तेथील काही युवकांच्या वतीने मोलाचे सहाय्य करण्यात आले. हरिहरेश्वरमधील काही पाड्यांमधे गोरगरीबांच्या घरांचे छप्परही उडून गेले. अनेकांच्या बागाही नष्ट झाल्या. ही वार्ता समजताच पेण येथील अथर्व घाटे, अजिंक्य खरे, वरद बंगाले, गौरव गोखले, साहिल जोशी, निर्मय दातार, तोषवी लिमये, आर्या देव, श्रेया साने आदी युवावर्गाने पुढाकार घेवून 65,000 रुपयांचा निधी जमा केला. तसेच पेण ब्राह्मण सभेनेही एक लाख रुपयांची मदत केली. यातून घरउभारणीसाठी लागणारी कौले, पत्रे आदी साहित्याची मदत तेथील वादळग्रस्ताना करण्यात आली. या कामी महेश हेलवाडे, प्रसन्न मोडक, सविता फडके, प्रशांत ओक, प्रसाद आघारकरख् मंदार मोडक, रविंद्र व वृषाली नगरकर तसेच स्थानिक गावकरी आदींनी सहकार्य केले.