Breaking News

पनवेल तालुक्यात 84 नवे रुग्ण

दोघांचा मृत्यू; 25 जणांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 21) कोरोनाचे 84 नवीन रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू तर 47 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 62  नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 18 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  पनवेल ग्रामीणमध्ये 22 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून सात रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात रविवारी 62 नवीन रुग्ण सापडले असल्याने महापालिका क्षेत्रातील रुग्णाची संख्या 1329 झाली असून वाढते रुग्ण पनवेलकरांसाठी धोक्याचा इशारा आहे. महानगरपालिका हद्दीत खारघर पाच, कामोठे 11, कळंबोली आठ, रोडपाली, आसूडगाव, कळंबोली गाव प्रत्येकी एक, नावडे चार,  खांदा कॉलनी नऊ, तळोजे धानसर तीन, धरणा कॅम्प तीन, करवले गाव व पेंधर प्रत्येकी एक, नवीन पनवेमध्ये 11 यामध्ये सेक्टर 18 पंचशील झोपडपट्टी, सेक्टर 4 व सेक्टर 19 मध्ये प्रत्येकी एक, तसेच सेक्टर 12मध्ये दोन, सेक्टर 9 हरिहर अपार्टमेंटमध्ये सहा, पनवेलमध्ये तीन यामध्ये तक्का येथे नॅशनल गार्डन, उरण नाका येथे अभिजित सोसायटी, कच्छी मोहल्ला अल्बदर बिल्डिंग येथे प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे.

तसेच पनवेल कच्छी मोहल्ला, कळंबोली येथील रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर पालिका हद्दीत बरे झालेले रुग्ण 18 आहे. यामध्ये कामोठे व कळंबोली येथे प्रत्येकी चार, खारघरमध्ये आठ, पनवेलमध्ये दोन रुग्ण पूर्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 1329 रुग्ण झाले असून 867 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65.24  टक्के आहे. 406 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 56 जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीणमध्ये रविवारी कोरोनाचे 22 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये वलप, कोळखे, केळवणे, पळस्पे येथे प्रत्येकी एक रुग्ण तर उलवे, विचूंबे, आदई येथे प्रत्येकी दोन रुग्ण, तसेच नेवाळी तीन, उसर्ली खुर्द चार, सुकापूर पाच असे कोरोनाचे रुग्ण आहेत. तर सात रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये केवाळे, कोप्रोली, सुकापूर, शिरढोण व आकुर्ली येथे प्रत्येकी एक व उलवे येथील दोन कोरोनाग्रस्त रुग्ण पूर्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.

माणगावमध्ये चार जणांना लागण

माणगाव : प्रतिनिधी

माणगाव तालुक्यात चार नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती रविवारी (दि. 21) सकाळी प्रशासनाकडून देण्यात आली. त्यानंतर आता माणगाव तालुक्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 झाली असून आतापर्यंत तालुक्यातील कोरोनाची लागण झालेल्या एकूण 67 रुग्णांपैकी 51 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले असून इंदापूरमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती तालुक्याच्या तहसीलदार प्रियंका आयरे कांबळे यांनी दिली.

उरण तालुक्यात चौघांना कोरोना

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यात रविवारी (दि. 21)  नवीन  चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. नागाव येथील 56 वर्षीय पुरुष, गोवठणे  येथील 45  वर्षीय पुरुष, धुतुम येथील 38 वर्षीय पुरुष व दिघोडे येथील 23 वर्षीय पुरुष यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच नागाव येथील 35 वर्षीय पुरुष व  उरण बौधवाडा येथील 57 वर्षीय पुरुष पूर्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 209 झाली आहे. त्यातील 175 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 32  कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व दोघांचा मृत्यु झाला आहे.

नवी मुंबईत एका दिवसात 105 रुग्ण कोरोनामुक्त

सात जणांचा मृत्यू; 154 नवे रुग्ण

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबईत रविवारी 105 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने बरे होऊन परतलेल्यांची संख्या दोन हजार 788 झाली आहे. दिवसभरात सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 164 झाली आहे. नवी मुंबईत एकाच दिवसात 154 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण संख्या चार हजार 841 वर पोहोचली आहे.

सध्या नवी मुंबईतील पालिका तसेच विविध खासगी रुग्णालयांत सद्यस्थितीत एक हजार 889 रुग्ण उपचार घेत आहेत. बाधितांची विभागवार आकडेवारी पाहिल्यास बेलापूर 13, नेरुळ 28, वाशी 17, तुर्भे 26, कोपरखैरणे 40, घणसोली 18, ऐरोली 5, दिघा 7 असा विभागवार रुग्णांचा समावेश आहे.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply