Breaking News

आंतरराष्ट्रीय योग कार्यशाळेमध्ये चांगू काना ठाकूर महाविद्यालयाचा सहभाग

पनवेल : रामप्रहर वृत्त

8 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन मुंबई ‘अ’ ग्रुपद्वारा राष्ट्र्रीय छात्रसेना संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या विद्यमाने तीन दिवसीय योग कार्यशाळेचे आयोजन 19 ते 21 जुन 2020 या कालावधीत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये राष्ट्र्रीय छात्रसेनेचे अधिकारी आणि 1000 हुन अधिक छात्रसैनिक सहभागी झाले होते. या कार्यशाळेत चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या राष्ट्र्रीय छात्रसेनेच्या 80हुन अधिक छात्रसैनिकांनी सहभाग घेतला होता. तसेच सी. टी. ओ. निलीमा तिदार आणि भवन्स महाविद्यालयाच्या कॅप्टन मालीनी  शर्मा यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यशाळेचे उद्घाटन कमांडीग ऑफीसर कर्नल अमित बागी यांच्या हस्ते करण्यात आले.अ‍ॅडमिनीस्ट्रेटीव्ह ऑफीसर मेजर रिचा शर्मा यांनी ह्या कार्यशाळेचे उत्तम नियोजन केले. तसेच सर्व राष्ट्रीय छात्रसेनेच्या ऑफीसर यांनी ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. ही कार्यशाळा डिजिटल प्रणालीवर आधारित झोहो आणि युट्युबच्या माध्यमातून घेण्यात आली.

यात योग म्हणजे काय तसेच सध्याच्या पँडॅमीक परिस्थिवर मात करण्यासाठी आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी योगासनाचे काय महत्व आहे हे छात्रसैनिकांना पटवून देण्यात आले. छात्रसैनिकांनी योगावर व्हिडीओ बनवून माय इंडिया माय गर्व्हमेंट आयुष मिनिस्टरी कंटेस्टमध्ये सहभाग घेतला होता.कोविड 19च्या पँडॅमीक काळातही योगाचे महत्व पटवून देण्याचे काम डिजिटायझेशनच्या माध्यमातून 8 महाराष्ट्र बटालियनने केले.

या कार्यशाळेसाठी माजी खासदार व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष  अरुणशेठ भगत, व्हाइस चेअरमन  वाय. टी. देशमुख, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, चांगू काना ठाकूर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत बर्‍हाटे आणि उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, कॅप्टन डॉ. यू. टी. भंडारे यांनी राष्ट्र्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक व कार्यशाळेच्या आयोजकांचे कौतुक करून ही कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply