आरोग्य प्रहर
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की वेगवेगळे आजार मान वर काढायला सुरुवात करतात. कारण वातावरणात झालेल्या बदलांचा प्रकृतीवर परिणाम होत असतो. सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे अशा समस्या नेहमी उद्भवतात. त्यातच या वर्षी कोरोनाची माहामारी असल्यामुळे सगळ्याच लोकांना आजारी पडण्याची जास्त भीती वाटत आहे. आज आम्ही तुम्हाला कोरोनाच्या माहामारीत पावसाळ्यातील साथीच्या रोगांशी लढण्यासाठी उपाय सांगणार आहोत.
पावसामुळे पुरसा सुर्यप्रकाश नसल्याने जंतूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे आपली प्रतिकार यंत्रणा कमकुवत होते. त्यामुळे आजारांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून पावसात भिजणेे टाळा, छत्री किंवा रेनकोट घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नका.
झाडांच्या कुंडीत किंवा डब्यात पाणी साचू देऊ नका. कारण अशा साठवलेल्या स्वच्छ पाण्यातच डेंग्यूच्या डासांची पैदास होत असते. डासांपासून बचाव करणारे जाळ्या, मच्छरदाणी, क्रीम यांचा वापर करावा. घरामध्येही फुलदाणी, फिशटँक यांची वेळोवेळी स्वच्छता ठेवावी.
रोगप्रतिकाशक्ती वाढवणार्या पदार्थांचे सेवन करा. गाजर, हळदीचे दूध, आले, लसूण, आहारात समावेश करा. हळदीत अँटीऑक्सिडंट गुण आहेत. सर्दी आणि खोकल्यासाठी लसूण अतिशय गुणकारी आहे. श्वसनाची समस्या असणार्यांसाठी आले खाणे अतिशय फायदेशीर आहे. उन्हाळा असो किंवा पावसाळा भरपूर पाणी प्या.
व्हिटॅमिन सी असणार्या पदार्थांचा आहारात समावेश करा. व्हिटॅमीन डी घ्या. बाहेर जाणे शक्य नसेल तर इमारतीच्या गच्चीवर किंवा गॅलरीतून सूर्यप्रकाश अंगावर घ्या. कारण सध्याच्या स्थितीत लॉकडाऊनमुळे व्हिटामीन डी ची कमतरता लोकांच्या शरीरात निर्माण झाली आहे.
बाहेर पडत नसाल तरी घरच्या घरी 20 ते 30 मिनिटे वेळ काढून व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. व्यायाम रोजे केल्याने तुमचे वजन वाढणार नाही. रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहिल. याशिवाय शरीर ताजेतवाने राहून शांत झोप येईल.